जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज पर्यटन विभागानं देशभरात विविध उपक्रम आयोजित केले होते. या दिनानिमित्त केंद्रसरकारने “पर्यटन मित्र” आणि “पर्यटन दीदी” हे दोन नवीन उपक्रम सुरु केले. या उपक्रमात पर्यटक स्नेही मार्गदर्शक तयार करण्यासाठी महिला आणि युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षणानंतर त्यांना आपल्या भागातल्या पर्यटनस्थळांवर हस्तकला आणि इतर उत्पादनं तयार करणे, खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणं, निसर्गसान्निध्यात भटकंती, वारसा स्थळांची सफर असे कार्यक्रम आयोजित करता येतील. प्रायोगिक तत्वावर आतापर्यंत देशभरात सुमारे तीन हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं पत्रकात म्हटलं आहे. मंत्रालयानं इनक्रेडिबल इंडिया कंटेन्ट हबचं उद्गाटनही केलं. देशभरातले विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर पर्यटकांना अभिप्राय नोंदवता येईल अशी सुविधा उपलब्ध करायचा मंत्रालयाचा विचार आहे.
Site Admin | September 27, 2024 8:07 PM | World Tourism Day