दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी काल शांततेत मतदान झालं. एकूण ६० पूर्णांक ४२ शतांश टक्के मतदान झालं असून सर्वाधिक ६४ टक्के मतदान ईशान्य दिल्लीत झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. तर अग्नेय दिल्ली मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, मनिष सिसोदिया, प्रवेश वर्मा, विजेंदर गुप्ता, अलका लांबा यांसारख्या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे.
निवडणूक सुरळित पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र स्ट्राँग रुममधे ठेवली आहेत. येत्या शनिवारी, ८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दिल्लीत सत्ता परिवर्तन होईल, असा अंदाज अनेक माध्यमांच्या मतदानोत्तर चाचण्यात वर्तवण्यात आला आहे.
Site Admin | February 6, 2025 1:37 PM | दिल्ली विधानसभा | निवडणुक
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकंदर ६० पूर्णांक ४२ टक्के मतदानाची नोंद
