धुळे जिल्ह्यात सोनगीर ग्रामपंचायतीत शौचालय अनुदान घोटाळा झाल्याचं उघडकीला आलं असून, या प्रकरणी महिला सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी आणि तीन लाभार्थीं विरोधात २१ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी १५ एप्रिल २०२० ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत, १७५ लाभार्थ्यांसाठी मंजूर झालेली शौचालयाच्या अनुदानाची रक्कम नियम बाह्य पद्धतीनं केवळ तीन लाभार्थ्यांच्या नावावर काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात नोटीस बजावण्यात आल्यावरही सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शासनाकडे रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे शासकीय रकमेचा अपहार केल्या प्रकरणी त्यांच्यासह एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.