प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात भारतातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून, ही वाहतूकसेवा जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात बोलताना सांगितलं. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्यानं उभारण्यात आलेलं टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशात नवीन ४६९ हवाई मार्ग सुरू झाले असून दिल्ली, बंगळुरु आणि अयोध्या विमानतळावर नवीन टर्मिनल उभी राहिली आहेत, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे, असं ते म्हणाले. आगामी काळात देशभरात आणखी २० ते २५ नवीन विमानतळांची उभारणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या टर्मिनल वरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.
Site Admin | July 14, 2024 8:15 PM | Murlidhar Mohol | Pune Airport’s new terminal