डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज नीरज चोप्रा पुन्हा मैदानात उतरणार

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पुन्हा आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

 

तर पुरुष हॉकी संघाची कास्य पदकासाठी स्पेन बरोबर लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल. तर पुरुष हॉकी संघाचा सामना संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.

 

कुस्ती मध्ये अमन सहरावत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात तर अंशु महिलांच्या ५७ किलो वजनी गटात, फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, भारताची वेटलिफ्टर मिराबाई चानु ४९ किलो वजनी गटात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारू शकली. तर धावपटू अविनाश साबळे याला पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेज प्रकारात अकराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा