आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. साजगित आरोग्य संबंधी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जगात मानसिक आरोग्याशी संबंधित उपचारांबाबत सजगता व्हावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो.
कार्यालयीन ठिकाणचे मानसिक आरोग्य अशी यावर्षीची संकल्पना आहे. या अंतर्गंत कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणं, मानसिक आरोग्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या घटनांपासून रक्षण करणं आणि गरजू व्यक्तींना मदत करणं अशा गोष्टींना प्राधान्य दिलं जाणार आहे.