आज जागतिक एड्स दिन. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना-नाकोच्या वतीनं १९९२ पासून प्रत्येक वर्षी १ डिसेंबर ला जागतिक एड्स दिवस पाळला जातो. या औचित्यानं आज मध्यप्रदेशातल्या इंदुर इथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एड्स दिवस २०२४ या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सही रास्ते पर चले ही या वर्षी एड्स दिवसाची संकल्पना आहे. एच आय व्ही बद्दल जागरुकता वाढवणं, उपचारासाठी अधिकार- आधारित दृष्टीकोनाला चालना देणं तसंच एचआयव्हीने प्रभावित लोकांविरुद्ध भेदभाव संपवणं या उद्देशानं आज देशभरात अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या वर्षीच्या एड्स दिनानिमित्त, जागरुकता वाढवणं, उपचारासाठी अधिकारांवर आधारित दृष्टिकोनाला चालना देणं, आणि एचआयवी/एड्स झालेल्यांविरुद्धचा भेदभाव नष्ट करणं यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजे नाको १९९२ पासून दरवर्षी १ डिसेंबर रोजी विश्व एड्स दिवस पाळत आहे.
Site Admin | December 1, 2024 2:50 PM | vishwa aids day