छटपूजा उत्सवाचा आज दुसरा दिवस असून त्यासाठी बिहारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. आज खरना विधी होणार आहे. सूर्य आणि छटी मैय्या यांची पूजा केल्यानंतर भाविक खीर आणि रोटी यांचं सेवन करतील आणि खरनानंतर 36 तास उपवास पाळला जाईल. विविध घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नद्यांच्या किनाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
Site Admin | November 6, 2024 11:07 AM | छटपूजा | बिहार