भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिसरी जागतिक हॅकेथॉन “HaRBinger 2024” चं आयोजित केली असून आज याच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी नोंदणी आणि त्यांचे प्रस्ताव
https://app.apixplatform.com/h1/harbinger2024 या संकेतस्थळावर नोंदवावेत असं आवाहन आरबीआयनं केलं आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आर्थिक फसवणूक टाळण्याचे विविध उपाय, टोकनवर आधारित व्यवहारात सुलभीकरण आणत ते अधिक सुरक्षित करणं, कोणतेही व्यवहार होत नसलेली बँक खाती ओळखणं आणि खराब झालेल्या नोटा अचूकपणं ओळखणं अशा विविध गोष्टींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या प्रस्तावांना आरबीआयनं आयोजित केलेल्या HaRBinger 2024 या हॅकेथॉनमध्ये निमंत्रित केलं आहे. आज या हॅकेथॉन नोंदणीचा शेवटचा दिवस असून यात १८ वर्षे आणि त्यावरील व्यक्ती अथवा समूह सहभागी होऊ शकतात.