जम्मू आणि काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकां तीन टप्प्यांमध्ये होणार असून तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. तर हरियाणात ९० जागांसाठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचाही आज शेवटचा दिवस होता. हरियाणात येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी ८ ऑक्टोबर रोजी होईल. तर जम्मू काश्मीरमध्ये ९० जागांसाठी ३ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.
दरम्यान, हरियाणा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावानंतर राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी आज १४ वी हरियाणा विधानसभा तत्काळ विसर्जित केली.