हिमाचल प्रदेश आज ७७वा स्थापना दिन साजरा करत आहे. ३० छोट्या छोट्या राजघराण्यांची संसथानं एकत्र करुन 15 एप्रिल 1948 रोजी हिमाचल प्रदेशची स्थापना झाली होती. यावर्षी राज्य स्थापना दिवसाचा मुख्य शासकीय कार्यक्रम चंबा जिल्ह्यात पांगी या डोंगराळ भागातल्या किल्लार या आदिवासी गावात होणार आहे.अशाप्रकारे डोंगराळ आदिवासी पांगी भागात प्रथमच हा शासकीय कार्यक्रम होत असून मुख्यमंत्री सुखविन्दर सुखू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या सथापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हिमाचलच्या नागरिकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्य असावं अशी शुभकामना त्यांनी व्यक्त केली आहे.
Site Admin | April 15, 2025 3:39 PM | स्थापना दिवस | हिमाचल प्रदेश
आज आहे हिमाचल प्रदेश चा स्थापना दिवस
