आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. “बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे. यानिमित्तानं केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीनं काल स्पेक्ट्रम ऑफ लिटरसी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजन केली गेली होती. समकालीन जगातील साक्षरतेशी संबंधित विविध पैलूंवरच्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणं तसंच यानिमीत्तानं होणाऱ्या चर्चांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांना सहभागी करून घेणं हा या परिषदेचा उद्देश होता.
Site Admin | September 8, 2024 2:04 PM | International | International Literacy Day | Literacy | Literacy Day