आसाममध्ये राज्य मंत्रिमंडळानं काल मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी अधिनियम १९३५ मधली बाल विवाहाशी संबंधित नियमावली रद्द करण्यासाठी विधेयक आणायला मंजुरी दिली. या नियमावलीमध्ये विशिष्ट परिस्थितीत अल्पवयीन मुलींच्या विवाहाला मंजुरी देण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळानं या वर्षाच्या सुरुवातीला ही नियमावली रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे नियम रद्द करण्यासाठी विधेयक मांडण्यावर सहमती झाली. आसामच्या कन्या आणि भगिनींना न्याय देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या पुढल्या सत्रात हे विधेयक मांडलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
Site Admin | August 22, 2024 6:01 PM | assam cabinet | Muslim Marriage and Divorce Act