राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 127 रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं तपासातून निश्चित झालं आहे. 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल 5 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
हा आजार वाढण्याची कारणे शोधण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे. दरम्यान, काल अहिल्यानगर शहरात या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळून आला असून त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
Site Admin | February 4, 2025 9:08 AM | GBS disease | State
राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण, 5 संशयित रुग्णांचा मृत्यू
