जगभरात आज व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणं, तसंच त्याबद्दल जनजागृती करणं आणि वाघांच्या संवर्धनात येणाऱ्या समस्यांवर विचार करणं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. जगातल्या एकूण वाघांपैकी ८० टक्के वाघ भारतात आढळतात. जागतिक वन्यजीव कोषाच्या माहितीनुसार भारतात वाघांची संख्या सतत वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत पर्यावरण वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची २५ वी बैठक पार पडली. वाघांच्या संरक्षणात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराची शक्यता शोधण्यावर मंत्र्यांनी भर दिला.