निविदा आणि खरेदी प्रक्रियेतल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे निरीच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, बिहार आणि दिल्लीत 17 ठिकाणी काल छापेही घालण्यात आले. निरीतील पाच सरकारी अधिकारी, तसंच नवी मुंबई, ठाणे, प्रभादेवी इथल्या तीन खासगी संस्थांमधल्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयनं ही कारवाई केली. सर्वसाधारण आर्थिक नियम डावलून या संस्थांना लाभ मिळवून देण्यात आल्याचं सीबीआयच्या तपासात आढळलं आहे.
Site Admin | July 11, 2024 12:17 PM | नागपूर | सीबीआय
नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल
