उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यात जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याच्या प्रकरणावरून झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जामा मशीदीचं सर्वेक्षण करून येणाऱ्या पथकावर आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली, अशी माहिती मोरादाबादचे पोलीस आयुक्त अंजनेय कुमार सिंह यांनी दिली. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
Site Admin | November 24, 2024 6:56 PM | Uttar Pradesh