छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनं शोध मोहिम राबवली.
या अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा हस्तगत करण्यात आला असून यात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. या विभागात शोध अभियान अजूनही सुरु आहे.