प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात आजपासून तीन दिवसांच्या नयनरम्य ड्रोन शो ला सुरुवात होणार आहे. या विशेष ड्रोन शो मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सनातन धर्माची वैशिष्टयं, परंपरा आणि वारसा दाखवला जाणार आहे. याशिवाय महाकुंभ मेळ्याचं धार्मिक महत्व आणि त्यामागील कथा हे या ड्रोन शो चं मुख्य आकर्षण असेल.
मेड इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेले अडीच हजार ड्रोन्स सलग तीन दिवस वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित सादरीकरण करणार आहेत. ड्रोनच्या साहाय्यानं पवित्र संगम स्थळी, समुद्र मंथन आणि अमृत कलश या पौराणिक घटना चित्रमयरित्या साकारल्या जाणार आहेत.