भंडारा जिल्हा ग्रामीण आरोग्य सेवेच्या येरली, वडद आणि लाखोरी या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने या पुरस्कारांसाठी प्रमाणपत्र जाहीर केलं आहे. भारतातल्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये, आरोग्य सुविधा आणि संसर्ग नियंत्रण करणाऱ्या मार्गांची अंमलबजावणी यांच्या गुणवत्तेचं मानांकन आणि मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत हे पुरस्कार दिले जातात.
Site Admin | January 16, 2025 3:50 PM | आयुर्वेदिक दवाखाना | भंडारा | राष्ट्रीय पुरस्कार
भंडारा जिल्ह्यातील तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
