डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर ते तातडीनं उतरवण्यात आलं. विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगो विमानही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर या विमानाची कसून तपासणी केली जात आहे. इंडिगोच्या मुंबईहून जेद्दाला जाणाऱ्या विमानातही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली.

 

दरम्यान, मुंबई हावडा गाडीही टाईम बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली. त्यानंतर ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. तिथं संपूर्ण गाडीची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू न मिळाल्यानं ही गाडी रवाना करण्यात आली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा