डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार जेष्‍ठ साहित्‍यिक डॉ. प्रेमानंद गज्‍वी यांना जाहीर

यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार जेष्‍ठ साहित्‍यिक डॉ.प्रेमानंद गज्‍वी यांना, तर कलागौरव पुरस्‍कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी अहमदनगर इथं ही माहिती दिली.

 

राज्‍यस्‍तरीय उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार डॉ.समीर चव्‍हाण यांना, राज्‍यस्‍तरीय विशेष साहित्‍य पुरस्‍कार प्रफुल्‍ल शिलेदार यांना, अहमदनगर जिल्‍हा साहित्य पुरस्‍कार डॉ.श्रीनिवास हेमाडे यांना, तर डॉ.विखे पाटील राज्‍यस्‍तरीय नाट्यसेवा पुरस्‍कार प्राजक्‍त देशमुख यांना मिळाला आहे. अहमदनगर जिल्‍हा विशेष साहित्‍य पुरस्‍कार प्रा.बाळासाहेब लबडे यांना दिला आहे.

 

येत्या नारळी पौर्णिमेला डॉ.विखे पाटील यांच्‍या १२४ व्‍या जयंती दिनी अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष रविंद्र शोभणे यांच्‍या हस्ते पुरस्‍कार वितरण होईल. महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील या कार्य.क्रमाला उपस्थित असतील, असं पुरस्‍कार निवड समितीचे निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा