डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 6, 2024 1:02 PM | FAO

printer

यंदा २८५ कोटी टनांपेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाचा कृषि संघटनेचा अंदाज

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेनं २०२४ या वर्षीचा जागतिक तृणधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा २८५ कोटी टन पेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाची शक्यता आहे. अर्जेंटीना, ब्राझिल, टर्की आणि युक्रेन मध्ये मक्याचं उत्पादन अधिक होईल तर आशिया मध्ये गव्हाचं उत्पादन चांगलं होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

धान्याच्या एकंदर उत्पादनापैकी तांदूळ आणि भरड धान्याचा वाटा सर्वाधिक राहील. २०२४-२५ मध्ये जागतिक तृणधान्याचा साठा ३० पूर्णांक ८ दशांश टक्क्यांवर राहील तर २०२५ मध्ये जागतिक तृणधान्याचा साठा १ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. जगात तांदळाचं विक्रमी उत्पादन ५३ कोटी ५२ लाख टनांपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा