तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता संमेलनाचं उद्धाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रेनंतर, उद्घाटन समारंभ होईल. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या, आदी कार्यक्रम होणार आहेत.
Site Admin | January 30, 2025 5:39 PM | Sammelan
तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु
