२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात ६१ चित्रपटांची निवड झाली आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार असून पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
Site Admin | December 28, 2024 8:15 PM | Third Eye Film Fest