उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
Site Admin | February 3, 2025 11:09 AM | तिसरं अमृत स्नान | महाकुंभ
महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
