उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं.
त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चा सुरु झाली आहे.
राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यावर महाकुंभाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. या आणि इतर मुद्द्यांवरुन विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. त्याच्या निषेधात काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
Site Admin | February 3, 2025 2:44 PM | Maha Kumbh Mela | parliament | गदारोळ
महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ
