डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशात मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय

देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मंकीपॉक्स हा आजार गंभीर स्वरूपाचा असून जागतिक पातळीवर याबद्दल WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कता जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं आज स्पष्टीकरण दिलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या एका बैठकीत मंकीपॉक्स या आजाराची देशातली परिस्थिती आणि उपयायोजनांच्या तयारीचा आढावा घेतला. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश या बैठकीत  देण्यात आले. मंकीपॉक्स संसर्गाचे रुग्ण दोन ते चार आठवड्यात बरे होतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 

 

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी आज या आजाराच्या वेगानं होणाऱ्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली असून दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवरून सहकार्य मिळावं, असं आवाहन केलं आहे. आफ्रिकेत आत्तापर्यंत या आजाराचे एकूण सतरा हजार ५४१ बाधित रुग्ण आढळले असून ५१७ मृत्यूंची नोंद झाल्याचं वृत्त आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा