राज्यात सध्या चिकनगुनिया आणि डेंग्यू या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे रुग्णांची संख्या वाढत आहे. हवामान बदलामुळे डासांची शक्ती आणि प्रजननक्षमता चारपट वाढली आहे, असं चेन्नईच्या आरोग्य सल्लागार डॉक्टर जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितलं आहे. त्या नागपूर इथं आयोजित एका कार्यशाळेत बोलत होत्या. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, आणि अधिक पाऊस यांचे प्रमाण वाढलं आहे, भौगोलिक व्याप्ती वाढत असल्यानं डासांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं त्या म्हणाल्या. जागतिक तापमानवाढीमुळे हृदय, किडनी, आणि यकृताचे आजारही झपाट्यानं वाढत असून स्त्री-पुरुषांमध्ये व्यंध्यत्वाचा धोकाही वाढल्याचं डॉक्टर श्रीधर यांनी म्हटलं आहे.
Site Admin | September 8, 2024 3:25 PM | Dengue