राज्यात हा आठवडाभर कमी आधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात राज्यातल्या सर्व विभागांमधे बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तरळक ठिकाणी अतिशय जोरदार, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
उद्याही राज्यातल्या चारही विभागांमधे बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
या काळात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे.