केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल छत्तीसगडमधील नवा रायपूर इथं अंमली पदार्थ नियंत्रण कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचं दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधल्या अंमली पदार्थांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठकही झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात अर्थात २०४७ पर्यंत देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आता प्रत्येक देशवासीयाचा संकल्प बनत आहे, असं शहा यावेळी म्हणाले.
Site Admin | August 26, 2024 1:02 PM | Amit Shah
‘देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प आता देशवासियांचा संकल्प’
