उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज इथं आशियाई किंग गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल. या केंद्राचे नाव जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र असं ठेवण्यात आलं आहे.आशियाई किंग गिधाडांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि पाळीव प्राण्यांमध्ये डायक्लोफेनाक, या दाहविरोधी औषधाचा अतिरेकी वापर, गिधाडांसाठी विषारी बनल्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.