डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लादलेल्या वाढीव आयातशुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होईल, असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं म्हणजे डब्ल्यूटीओनं व्यक्त केला आहे. या संघटनेनं २०२५ आणि २०२६ या वर्षांसाठीच्या व्यापाराचा अंदाज काल प्रसिद्ध केला. त्यात अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार संघर्षाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डब्ल्यूटीओच्या महासंचालक नगोझी ओकोंजो-इविला यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार ८१ टक्क्यांनी कमी होईल असं त्यांनी म्हटलं आहे. जगभरातील व्यापार २०२५मध्ये २ दशांश टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर खटला दाखल करेल, असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसोम यांनी जाहीर केलं आहे. ट्रंप यांनी विविध देशांवर वाढीव आयातशुल्क लादल्यामुळे कॅलिफोर्नियात भाववाढ होत असून बेरोजगारीचा धोका वाढत आहे, असं न्यूसोम यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. वाढीव आयातशुल्काचा सर्वांत जास्त फटका कॅलिफोर्नियाला बसत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा