डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 5, 2024 1:13 PM | #AsianBuddhistSummit

printer

जगाला करुणेची गरज- राष्ट्रपती

भारताला प्रत्येक युगात थोर मार्गदर्शक लाभले असून, यामध्ये भगवान गौतम बुद्धांचं स्थान अढळ आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं आयोजित पहिल्या आशियाई बौद्ध परिषदेला संबोधित करत होत्या. सिद्धार्थ गौतम यांना बोधगया इथं बोधी वृक्षाखाली झालेली ज्ञानप्राप्ती, ही इतिहासातली असामान्य घटना असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 

 

जग आज विविध आघाड्यांवर अस्तित्वासाठी झगडत असताना, बौद्ध समुदायाकडे मानवाला देण्यासारखं खूप काही आहे, असं त्या म्हणाल्या. बौद्ध धर्माचा मध्यवर्ती संदेश शांतता आणि अहिंसेवर केंद्रित असून, आज  जगाला करुणेची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. 

 

केवळ आपल्या सीमेपुरता मर्यादित न राहता, जगभरात ज्याचा प्रसार झाला आहे, त्या बौद्ध धर्माचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्यानं ही दोन दिवसीय परिषद आयोजित केली आहे. ‘आशियाला बळकट करण्यात बौद्ध धम्माची भूमिका’, ही या परिषदेची संकल्पना आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा