जागतिक आरोग्य संघटनेनं दोन वर्षांत दुसऱ्यांदा एमपॉक्स या आजारावरुन आणीबाणी घोषित केली आहे. मध्य आफ्रिकेतल्या काँगो देशात या विषाणूजन्य संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी ही घोषणा केली.
बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या देशांमध्येही त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. Mpox संसर्गजन्य असून क्वचित प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरु शकतो. याची लक्षणं फ्लूसारखी असतात आणि शरीरावर व्रण होतात. WHO नं आकस्मिक निधी म्हणून १५ लाख अमेरिकन डॉलर्स दिले आहेत.