डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ट्रॅकोमा हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार भारतातून हद्दपार झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर

ट्रॅकोमा हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार भारतातून हद्दपार झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. हे लक्ष्य गाठणारा भारत हा आग्नेय आशिया क्षेत्रातला तिसरा देश आहे. नवी दिल्लीत काल जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रदेश समितीने भारताला ट्रॅकोमामुक्त देश म्हणून प्रमाणित केलं. पन्नास ते साठीच्या दशकापर्यंत भारतात अंधत्वासाठी जबाबदार असणाऱ्या प्रमुख कारणांपैकी ट्रॅकोमा हा एक होता. भारताने १९६३ मध्ये ट्रॅकोमा निर्मूलन कार्यक्रम सुरु केला होता.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा