राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्री दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीच्या साह्याने ही दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आलं आहे. या मार्गावरून आता एका बाजूने दुचाकी वाहनांची वाहतूक सावधगिरीनं सुरू करण्यात आली असून, मोठ्या वाहनांनी आंबा घाटाच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
Site Admin | June 14, 2024 3:23 PM | कोल्हापूर | दरड | राजापूर