धरणातल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वापर करावा अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंत्रालयात ते बोलत होते. सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी अडथळा येऊ नये असे नियोजन जलसंपदा विभागाने करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांच्या सुधारित मान्यतेचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासोबतच विविध प्रस्तावांना नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातल्या सर्वच पदांचा आकृतीबंध त्वरित तयार करुन रिक्त पदांचा अनुशेष भरण्याची कार्यवाही करावी, अशी सूचनाही महाजन यांनी केली.
Site Admin | January 16, 2025 7:54 PM | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन | धरणातलं पाणी | सिंचन
धरणांमधल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेनं वापर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश
