देशात लाखोंच्या संख्येनं अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपतीं जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवैध प्रवासी नागरिक देशामध्ये राहणं धोकादायक असून, अशा परदेशी घुसखोरांना निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव पडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, देशातल्या युवकांनी अशा राष्ट्र विरोधी घटकांचे वैचारिक मनसुबे हाणून पाडावे असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने आयोजित परिषदेत ते काल बोलत होते. युवकांनी यापुढे आपल्या अस्तित्वासंदर्भातील आव्हानं ओळखून भारतीय अर्थ व्यवस्था भक्कम करण्यासाठी आर्थिक राष्ट्रवाद मनात रुजवण्याची गरज आहे असंही उपराष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाले.