डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘वाढवण बंदर प्रकल्पामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये १ टक्का वाढ होईल’

वाढवण बंदर प्रकल्प हा भारताच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असून यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये एक टक्के वाढ होईल, असा विश्वास जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणचे प्रमुख उन्मेष वाघ यांनी व्यक्त केला. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. कंटेनर वाहतुकीसाठी मुंद्रा आणि जेएनपी या बंदराची क्षमता कमी पडत असून यासाठी वाढवणसारख्या बंदराची गरज आहे. या बंदरानंतर पश्चिम भारताला नव्या बंदराची गरज उरणार नाही, तसंच मुंबईचं महत्त्व अबाधित राहील असं वाघ म्हणाले.

 

वाढवण बंदरासाठी जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, त्यामुळे पालघर भागातल्या लोकांचं विस्थापन होणार नाही. तसंच या प्रकल्पामुळे मच्छिमारांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. वाढवण बंदर प्रकल्प हा पर्यावरणपूरक प्रकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकल्पामुळे दहा लाख नोकऱ्या निर्माण होतील असंही वाघ यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा