दहशतवाद आणि अतिरेकी विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटचा वापर ही सध्याची गंभीर आव्हान असून त्याकरता जगातल्या सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन युरोपीयन संघाचे राजदूत हर्व डेल्फिन यांनी केलं आहे. दिल्लीत आज युरोपीयन संघ – भारत परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक दहशतवादविरोधी मंडळ आणि भारताच्या परराष्ट्रव्यवहार विभागातर्फे ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Site Admin | August 21, 2024 1:38 PM
दहशतवाद आणि अतिरेकी विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटचा वापर हे गंभीर आव्हान – युरोप
