तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते.
ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टरांना पोहोचणं शक्य नसतं तिथले रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकरणार आहेत. दर्जेदार आणि चांगल्या आरोग्य सेवेसाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे, असं फडणवीस म्हणाले. याप्रसंगी देवाशीष भट्टाचार्य, रघुनाथ माशेलकर, शरद सराफ, पार्था घोष आदी मान्यवर उपस्थित होते.