अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं ४ वर्षानंतर पहिल्यांच व्याजदरात कपात केली आहे. बँकेनं त्यांच्या व्याजदरात अर्धा टक्क्यांची कपात करुन हा दर पावणे ५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान नेला आहे.
फेडरल ओपन मार्केट समितीच्या २ दिवस चाललेल्या बैठकीनंतर या अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी हा निर्णय जाहीर केला. महागाई आटोक्यात आल्यानं आणि बेरोजगारीची भीती वाढल्यानं ही कपात आवश्यक असल्याचं पॉवेल म्हणाले.
व्याजदरात अपेक्षेपेक्षा अधिक कपात झाल्यानं जगभरातले शेअर बाजार तेजीत होते. भारतीय शेअर बाजारांनीही आज व्यवहार सुरू झाल्यानंतर विक्रमी पातळीला स्पर्श केला होता.