अमेरिका आपले स्थलांतराचे कायदे आणखी कठोर करत असल्याचं अमेरिकेच्या दूतावासानं म्हटलं आहे. अमेरिकेची लष्करी विमानं अवैध स्थलांतरितांना भारतात घेऊन जात असल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी दूतावासानं हे स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेली भारतीय नागरिकांची ही पहिली तुकडी आहे.
अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांविरोधात कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं असून, याबाबतच्या अनेक आदेशांवर स्वाक्षरी केली आहे.
अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतर ही जोखीम असल्याचा स्पष्ट संदेश अमेरिकी दूतावासानं दिला आहे.
Site Admin | February 4, 2025 2:10 PM | अमेरिका | अमेरिका दूतावास | स्थलांतराचे कायदे
अमेरिका आपले स्थलांतराचे कायदे आणखी कठोर करत असल्याचं अमेरिकेच्या दूतावासाकडून स्पष्ट
