अमेरिकेनं युक्रेनसाठी ७२ कोटी ५० लाख डॉलर्सची नवीन लष्करी मदत जाहीर केली आहे. त्यात भूसुरुंग तसचं हवाई हल्ला प्रतिरोधक शस्त्रांचा समावेश आहे. युक्रेनचा रशियापासून बचाव करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचं परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले. ट्रम्प प्रशासन युक्रेनला मिळणारी लष्करी मदत थांबवण्याची शक्यता असल्यानं राष्ट्राध्यक्ष जो बायडेन त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची मदत देत आहेत.