USAID, अर्थात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेनं आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संस्थेचं राज्य विभागाबरोबर विलीनीकरण करण्याचे आदेश दिल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला. परदेशात कार्यरत असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या आत कामावर परत बोलावण्यासाठी राज्य विभागाबरोबर एक योजना आखली जात असल्याचं संस्थेनं आपल्या वेबसाईटवर म्हटलं आहे. संस्थेच्या आवश्यक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची सूचना येत्या गुरुवार पर्यंत दिली जाईल असं यात म्हटलं आहे.
एका संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, USAID मध्ये १० हजारापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून, यापैकी दोन तृतीयांश कर्मचारी ६० पेक्षा जास्त देशांमध्ये आणि प्रादेशिक मिशन मध्ये काम करत आहेत.
Site Admin | February 6, 2025 2:14 PM | US Agency for International Development | कर्मचारी | प्रशासकीय रजा
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे दिले आदेश
