डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय गृहमंत्री आज देशातल्या सात विमानतळांवरच्या जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं करणार उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचिन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं उद्घाटन करणार आहेत. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विनाअडथळा होण्यासाठी मदत होणार आहे. या यंत्रणेनुसार प्रवाशांना ftittp.mha.gov.in या संकेतस्थळावर त्यांचे तपशील भरावे लागतील आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतील.
नोंदणीकृत प्रवाशांचे बायोमेट्रिक तपशील परदेशी विभागीय नोंदणी कार्यालयांमध्ये किंवा परदेशांमधल्या विमानतळांवर नोंदवले जातील. प्रवाशांनी त्यांचे बोर्डिंग पास आणि पासपोर्ट विमानतळांवर स्कॅन केल्यानंतर प्रवाशांच्या बायोमेट्रिक तपशीलांची वैधता तपासून बघितली जाईल. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर ई-गेट आपोआप उघडले जातील आणि त्यांचे इमिग्रेशन झाल्याचे सूचित केले जाईल. या प्रणालीची अंमलबजावणी देशातील २१ विमानतळांवर केली जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा