देशभरात डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकार विविध योजना तयार करीत असून राज्यसरकारांबरोबरही संपर्कात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. डेंग्यू विषयी मदत, मार्गदर्शन आणि माहितीसाठी एक विशेष हेल्पलाईन केंद्रीय आरोग्यमंत्रालय सुरु करणार असून राज्यसरकारांनी देखील अशा हेल्पलाईन सुरु कराव्या असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रुग्णालयांनी डेंग्यूप्रतिबंध आणि निवारणासाठी सज्ज रहावं, तसंच संबंधित विभागांनी आपसात ताळमेळ राखून अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. देशभरात डेंग्यू प्रादुर्भाव आणि प्रतिबंध या संबंधातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नड्डा यांनी एक बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.
Site Admin | July 10, 2024 6:46 PM | J P Nadda | डेंग्यू
डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकार विविध योजना तयार करीत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती
