आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी, प्रतिनिधींशी सुरू असलेली अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत काल पूर्ण झाली. गेल्या वर्षी सहा डिसेंबरपासून ही सल्लामसलतींच्या फेऱ्या सुरू होत्या. शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, एमएसएमई, व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थतज्ज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार अशा नऊ गटांमधील शंभरहून अधिक निमंत्रितांनी या चर्चेत भाग घेतला. त्यांच्या मौल्यवान सूचनांबद्दल अर्थमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. केंद्रीय अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्या सूचनांचा काळजीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, दहा जानेवारीपासून, सर्वसामान्य नागरिकांना माय जीओव्ही या प्लॅटफॉर्मवर केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सूचना पाठवता येणार आहेत.
Site Admin | January 7, 2025 11:14 AM | केंद्रीय अर्थसंकल्प | निर्मला सीतारामन