डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं.अमेरिकतल्या कोलंबिया विद्यापीठात त्या बोलत होत्या. भांडवलाच्या उपलब्धतेमुळे भारतीय बँकिंग व्यवस्था बळकट राहिल्याचंही त्या म्हणाल्या.महत्त्वाच्या उद्योगांमधली गुंतवणूक वाढवण्यासाठी आवश्यक भांडवल पुरवठा करणं हाच भारताच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं.सध्या भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून जागतिक विकासात भारताचं योगदान पुढच्या पाच वर्षांत आणखी वाढेल, असा विश्वासही सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा